दहीवडे

आज तुमच्या बरोबर दही वडा रेसिपी शेअर करत आहे, ती माझी खास मैत्रीण , म्हणजे माझी ननंद सौ. सरोज कनोरे आणि अविनाश भाऊजींनी बनवली आहे

सौ. सरोज व श्री अविनाश यांचा 19 मे ला लग्नाचा वाढदिवस असतो त्या दिवशी खास दोघांनी त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवला. तो अनिकेतने (भाच्याने) कॅप्चर करून माझ्याकडे पाठवलं.पण माझ्या मुलीच्या लग्नाच्या गडबडीत व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला , पण तरीही जरा उशिरा हा व्हिडिओ शेअर करताना मला खूप आनंद होत आहे त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.
त्यांचे एकमेकांवरचे प्रेम कायम असेच राहो, वृद्धिंगत व्हावे हीच शुभेच्छा!!

5236a170-01bb-4b0a-9e69-6bd06294ad47-01

दहीवडे

साहित्य
उडदाची डाळ १ कप

मुगडाळ १/२ कप

मीठ चवीनुसार

दही मिश्रण साहित्य
दही ३ कप

साखर अथवा मध २ चमचे अथवा चवीनुसार

जीरेपूड किंवा चाटमसाला २ चमचे

मीठ

लाल तिखट

खजूर चिंच चटणी २ चमचे
कृती
उडदाची व मूूग डाळ ४_५ तास पाण्यात भिजत घाला.

d29a2810-b0b5-4bcb-a022-2f1a4c2cc41b-01

४ ते ५ तासाने डाळी वाटून घ्या .

d3289709-e922-488a-a6bc-b553ca456578-01

मिश्रणात गरज वाटल्यास किंचित पाणी घाला.

c24518e0-12e4-40b7-ab7f-ae96e8dcffde-01

तळण्यासाठी कढईत तेल तापवा.

मीठ घालून मिश्रण एकजीव करावे.

ओल्या हाताने साधारण २ चमचे मिश्रण घेऊन वडे तळा.

एका भांड्यात पाणी किंचित तापवा व त्यात १/२ चमचा मीठ घाला.

PicsArt_1429879222925

तळलेले वडे ह्या कोमट पाण्यात टाकून १० मिनीटे भिजवा.

पाण्यातून हलकेच दाबून अतीरीक्त पाणी काढून टाका.

पसरट भांड्यात वडे ठेवा .
दही कृती
घट्ट दह्यात मीठ व साखर टाकून घुसळा.

PicsArt_1429880881157

मध टाकणार असल्यास दही व मिठ घुसळून नंतर मध घाला.

त्यावर खजूर चिंच,लाल तिखट व जीरेपूड अथवा चाटमसाला भुरभुरवा.

थंडगार व चवदार दही वडे नक्कीच आवडतील.

5236a170-01bb-4b0a-9e69-6bd06294ad47-01

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s