Cutlet Urvashi Spl.

उर्वशी माझी छोटीशी, अवखळ, नटखट मुलगी
बाबांची अतिशय लाडकी.
लहान भाऊ सौरव त्याचा ताई वर भलताच जीव आहे , सतत तिच्या मागे लागणार, पळणार आणि भांडणार. तिने आई ग !! केलं की हाच कावराबावरा होणार.
माझी लहानशी परी, आई-आई दिवसभर करणारी ,अलगत मोठी होत गेली, इतकी मोठी की लग्नाच्या वयाची !

मन कातरल,मनात खूप कालवाकालव होत होती.
पण प्रत्येक गोष्टीची नक्की वेळ ठरलेलीच असते,नव्हे विधिलिखितच असते सर्व.
तिच्या साठी समोरून स्थळ आले काय आणि आम्ही १५ फेब्रुवारीला स्थळ बघितलं काय आणि पंधरा दिवसात लग्न ठरलं सुद्धा. रूपया-नारळ (सुपारी फुटली) ५ मार्चला आणि साखर पुडा २४ जूनला आणि लग्न ,२५ जूनला होते काय ! सगळंच झटपट. उर्वशीच्या स्वभावाप्रमाणे तिचं सर्व काम झटपट चालणार पटापटा , बोलणार टपाटपा, ओळखी होणार पटकन आणि त्यांच्याशी गप्पा मारणार झटकन, सर्वच फटाफट. वेळ घालू हा प्रकारच नाही तिच्याकडे.
माझी लाडकी लेक, सतत आई -आई करत मागे फिरणार, अख्खा दिवस गप्पा आणि गप्पा. गप्पांना विषयाचं बंधन नाही सर्व प्रकारच्या गप्पा राजकारण असो नातलगांचे विषय असो स्वयंपाकात विशेष गोडी, घराबद्दल चर्चा मैत्रिणीबद्दल काही ना काही सतत चालू.

आई म्हणून माझा जीव धास्तावला. हिला करमेल का सासरी आणि माझं मलाच हसू आलं. न करमन्या सारखं काय आहे,घरात भरपूर माणसं आहेत. अगदी आम्हाला महत्त्वाचे म्हणजे उर्वशीला आवडेल असच. माझी लाडकी लेक…….. त्यामुळे स्वयंपाक तर नाही सगळा पण कधी एखादी भाजी, नाश्त्याचा एखादा पदार्थ, कधी पोळी , कधी भाकरी , जे काही करणार त्याचं कौतुक अपार. बाबा पोटभर जेवणार, सौरव त्याचे फोटो काढणार, सगळे मिटक्या मारत खाणार. असं कोडकौतुकच माझं बाळ. खूप काळजी वाटायची.सासरी सगळं निभावेल ना ? कसं करेल ? कामाची तर सवयच नाही,जमेल ना हिला ?


गुरुवारी २५ जूनला लग्न झाले, परतावणी झाली परत सासरी गेली आणि दुसऱ्या गुरुवारी सकाळीच सात वाजता फोन आला, आई sss , गुड मॉर्निंग !! मला सांग कटलेट कसे करायचे, मी जरा अवाकच झाले,

काय sss! अगं माझ सगळं अवरलंय, ब्रेकफास्ट बनवायचा आहे तर कटलेट ची रेसिपी सांग ना !! दोन मिनिटं मला काय बोलावे सुचेना, आतून खूप भरून येत होतं माझी मुलगी गृहिणी झाली, अग आई काल पुलाव बनवला होता पण बराच उरलाय त्याचे कटलेट बनतील ना ?😀

Pulaoआणि तिने बनवलेल्या कटलेट चे फोटो ही आले .

ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करताना मला खूप खूप आनंद होतोय तिच्या सासरी सर्वांना खूपच आवडले, spl. सासुबाईंना त्यानी call करुन संगितले की उर्वशी ने खुप छान केलेत कटलेट, आणी मला परमानंद झाला, यापेक्षा अधिक काय हवे आईला.

खात्री आहे तुम्हालाही आवडतीलच, तुम्ही ही बनवा आणि प्रतिक्रिया अपेक्षित….
धन्यवाद


रेसिपी खालील प्रमाणे


साहित्य


भाज्या घालून केलेला पुलाव
फ्लॉवर
हिरव्या मिरच्या
मीठ
बटाटे
रवा
ब्रेड़ क्रम्ब्स

कृती

भात मिक्सर मधून जरासा फिरवून घ्यायचा ( म्हणजे कालचा भात आज परत खातोय, हे सांगितल्या शिवाय कोणाला कळातहि नाही)
एका पसरट भांड्यात घेऊन त्यात घरी असतील त्या भाज्या (कोबी, गाजर, फुलकोबी, बीट ) उर्वशी ने फ्लॉवर धुऊन किसून घातला होता.
दोन उकडलेले बटाटे mash करून घालायचे.
त्यात चवीनुसार मीठ, हिरव्या मिरच्या बारिक चिरुन वा वाटून घाला.

मिश्रण सैलसर वाटले तर जरा रवा घालुन मिक्स करुन दहा मिनिटे बाजुला ठेवून द्यावे, रवा फुलतो व मिश्रण आवळते.
पुन्हा हे सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत मिळवायचे आणि कटलेटचा आकार देऊन ब्रेडक्रम्स मधे घोळवून तव्यावर थोडं तेल घालून ब्राऊन रंगात shallow fry करायचे.


आणी मग काय गरम गरम मस्त sauce बरोबर स्वाहा करायचे.

तळटिप:
पानात वाढलंय तेवढं पूर्ण संपवायचं नाहीतर देवबाप्पा रागवेल’ असं म्हणून नेहेमी दम भरायचे आणि मग मुलं निमूट पानातलं सगळं नेमानं संपवायचे . एकतर चौरस आहार मिळावा म्हणून सगळे पदार्थ पोटात जाणे आवश्यक आणि दुसरे अन्न वाया जाऊ देऊ नये हा आपला उद्देश. Actually अन्न वाया घालवणे ना परवडणारे ना मनाला पटणारे. आता काही वेळेस अन्न उरतं. अश्या उरलेल्या अन्नाचा वाया न जाऊ देता योग्य सदूपयोग करून घेणे कौशल्याचे काम आहे. एवीतेवी हे प्रत्येक गृहिणीला अनुभवाने छान येत असतं. म्हणूनच आपल्या उरलेल्या अन्नाच्या छान रेसिपीज करतो.

15 Replies to “Cutlet Urvashi Spl.”

 1. खरच ग ,मुली पटकन मोठ्या होतात, जबाबदारी घेतात,आपल्या डोळ्यासमोर मात्र तीच ते चिंमुकल ,अवखळ रूप असत नि वेड मन काळजी करत राहत. पण हळू हळू आपण छोटे नि मूली मोठ्या होतातखूप छान उर्वशी keep it up beta ,खूप आशीर्वाद

  Liked by 1 person

 2. Wah sunderach shabdankan. Padarth tar Neha mich khato pan khas poti I banawale tar aankhon lajjat wadhate

  Liked by 1 person

  1. हो बरोबर आहे तुमचे ….
   मन वढाय वढाय, नाही त्याला धीर, मुलगी गेलीं सासरी जीवाला खूप घोर

   मन वढाय वढाय, नात्यातील गर्दीत हरवली ही पोर ,
   किती समजदार ही , खूप धीराची ही पोर.

   मन मोकाट मोकाट त्याले ठायीं ठायीं वाटा,
   तिच्या आठवणींनी फुटल्या भावनांच्या लाटा.

   लेक माझी पांखरू पांखरूं त्याची काय सांगूं मात ?
   आतां व्हती माहेरच्यात , पटकन गेली माझी पोर संसारात.

   देवा, कसं केल आम्ही कन्यादान !
   तिच्या विना नाही आता करामत झाले जड मान

   धन्यवाद देवा तुला, घेतले माहेरपण
   आणि दिले सोन्या सारखे सासरपण

   श्रीमती बहिणाबाई च्य कवितेवर आधारित आणि त्यांची क्षमा मागून

   Like

 3. खूप छान . कटलेपेक्षा तुमच्या भावना खूप छान.dont worry now she is my daughter !

  Liked by 1 person

  1. धन्यवाद, मला माहितच आहे तुम्ही तिची खुप कळजी घेताय कारण ती सारख कौतक करत असते.

   Like

  2. हो, मला कळलय ते,😊 कारण उर्वशी खुप कौतुक करत असते तुमचं, मला आता अजिबात काळजी वाटत नाही 😊

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s