मिक्स डाल पराठा

पौष्टिक व पोटभरीचे वेगवेगळया प्रकारच्या डाळीचे पीठाचे चविष्ट पराठे सॉस किंवा चटणी सोबत न्याहारी किंवा डब्यात देता येतील.

तसेच सध्याच्या परिस्थितीत रात्रिच्या जेवणासाठी उत्तम पर्याय

साहित्य

३ वाट्या कणीक

१/४ वाटी बारीक रवा

मीठ

१/२ चमचा तेल

१ चमचा ओवा

सारणाच साहित्य

१/४ वाटी तूरडाळ

१/४ वाटी मसूर

१/४ वाटी हरभरा डाळ

१ टे.स्पून आले-लसूण-मिरची पेस्ट

१/२ टि. स्पून तिखट

चवीनुसार मीठ

अनारदाणा/आमचूर पावडर

कृती

कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.

नंतर मळून एकसारखे गोळे करावे.

डाळी भिजवून २-३ तासांनी निथळायला ठेवा . १/२ तासाने रवाळ वाटाव्यात.

तेल तापवून ओव्याची फोडणी करावी. डाळीचे मिश्रण घालून त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे.

परतून २ वाफा काढून आमचूर पावडर घालून उतरावे.

कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन ठेवा .

नेहमीप्रमाणे कणकेच्या पिठाची खोलगट वाटी करून त्यात डाळ भरून हलक्या हाताने पराठे लाटावे.

तुपावर/ तेलावर छान खरपूस भाजावे.

हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.

हे पराठे लोणचं, दही, चटणी सोबत छान लागतात.

गरमागरम सर्व्ह करावेत .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s