मटणाचे लोणचे

अतिशय चविष्ट,मटणाचे लोणचं ckp लोक जास्त करून करतात.

अतिशय उत्तम लागते.

एकदा बनवलं की महिनाभर टिकतं ( बाकी राहिलं तरच)

मटणाचे लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य…

साहित्य

मटण 1/2 किलो (मटण बोनलेस व कोवळे घ्यावे)

3 ते 4 लिंबाचा रस

मीठ चवीनुसार

हळद 1 चमचा

आले लसणाचे वाटण 2 चमचे

मेथ्या 1 चमचा

हिंग 1/4 चमचा

मोहरी 1 चमचा

लोणच्याचा तयार मसाला 1 डावभर

मोहरीचे तेल अथवा तिळाचे तेल 5०० ग्रॅम

गरम मसाला वाटण्यासाठी

लवंगा 3-4

अर्धा दालचिनीचा तुकडा

वेलची 3-4

काळी मिरी 5-7

शाहीजीरे 1 चमचा

सुख्या लाल मिरच्या 4-5

खसखस 2 चमचे

धणे 1 चमचा

बडीशेप 1 चमचा

जिरे 1/2 चमचा

सुखे खोबरे लहान वाटी

कृती

गरम मसाल्याचे सर्व पदार्थ गरम करून त्याची पूड करावी, बाजूला ठेवावी.

मटण स्वच्छ धुवून निथळून घ्यावं.

आलं लसनाचं वाटण, मीठ व हळद लावून मटण अर्धा तास मुरत ठेवावे.

अर्धा तास मुरत ठेवलेले मटण कुकर मधून चांगले वाफवून घ्यावे, मऊ शिजले पाहिजे. (पाणी कमीत कमी घ्यावे)

कुकर चं झाकण निघालं की पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यावर आले लसूण वाटण चांगले परतावे, लगेच त्यावर मटण घालून परतावे , आच मध्यमच ठेवावी, पाणी पूर्ण आटू द्यावं.

आचेवरून उतरवून थंड होऊ द्यावे.

दुसऱ्या पॅनमध्ये उरलेलं तेल गरम करून घ्यावे. त्यावर राई, हिंग, मेथी घालावी व फोडणी झाल्यावर लगेच मटण घालुन परतावे.

मग त्यात गरम मसाला पावडर घालावी , चांगले एकत्र कालवावे.

आचेवरुन उतरवावे, नंतर लोणच्याचा मसाला घालून पुनः एकत्र कालवावे. त्यावर ४-५ लिंबाचा (अंदाजे १ वाटी रस ) घालून नीट ढवळावे.

व पूर्ण थंड झाल्यावरच घट्ट झाकणाच्या बाटलीत भरावे, १ दिवस पूर्ण मुरू द्यावे. हे लोणचे १५ दिवस ते १ महिना टिकते.

लोणचं काढताना चमचा नेहमी कोरडा घालावा .

लोणचे खायला घेताना आवडत असल्यास त्यावर कोथिंबीर, पुदिना यांच्या बारीक कापलेल्या पानानी सजवावे.

ज्वारीची भाकरी बरोबर हे लोणचे अतिशय चविष्ट लागते.



Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s