दाल पकवान {सिंधी डिश}

दाल पकवान बनवण्यासाठी साहित्य

डाळ बनविण्यासाठी

1 वाटी चणाडाळ
मुठभर मुगाची डाळ (optional )

2 हिरव्या मिरच्या

1 बारीक चिरलेला टोमॅटो

1 लहान चमचा हळद पूड

1 लहान चमचा लाल तिखट

1 लहान चमचा गरम मसाला (optional )

1 लहान चमचा धणेपूड

1 लहान चमचा आमचूर पावडर

मीठ चवीनुसार

तेल – आवश्यकतेनुसार

पकवानसाठी साहित्य

1 वाटी मैदा

1 लहान चमचा ओवा

1 मोठा चमचा तूप

मीठ चवीनुसार

तळण्यासाठी तेल

वाढण्यासाठी साहित्य

1 उभा चिरलेला कांदा

बारीक चिरलेली कोथिंबीर

चिंचेची चटणी

हिरवी चटणी – आवश्यक वाटल्यास

चाट मसाला चवीनुसार

दाल पकवान

डाळीसाठी
चण्याची डाळ धुवा आणि 1 तास पाण्यात भिजवून ठेवा. प्रेशर कुकरमध्ये दोन्ही डाळीत दीड ते दोन कप पाणी घालून शिजवा. 1-2 शिट्ट्या घ्या. डाळी जास्तही शिजवू नये.
( मूग डाळी मुळे घट्टपना येतो, तसच चव अप्रतीम लागते.)

कढईत चमचाभर तेल तापवून टोमॅटो परतून घ्यावे. परतले कि हळद घालुन परतावे. तिखट, धनेपूड घालुन परतुन, शिजलेली डाळ घालुन मिक्स करुन, चवीनुसार मीठ घालुन चांगली उकळावी.
हिरव्या मिरच्या तळून घ्या.

आच बंद करा.

कोथिंबीरीने सजवा आणि बाजूला ठेवा.

पकवानसाठी
पीठ चाळून घ्या. पिठात ओवा, मीठ आणि तूप घाला. चांगले मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळा.

एक कढईत पुरेसे तेल गरम करा. पीठाचे एकसारखे गोळे करा, आणि प्रत्येक गोळ्याची एक पातळ पुरी लाटा.

काट्याने त्या पुरीला छिद्र करा. जेणेकरून पुरी फुलणार नाही. तेल पुरेसे गरम झाले की मंद आचेवर पुऱ्या घालून बदामी रंगाच्या किंवा कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळा.

कागदावर निथळण्यासाठी ठेवा. नंतर त्याला बाजूला ठेवा.
वाढण्याअगोदर डाळ पुन्हा गरम करा.
एका वाढण्याच्या डिशमध्ये पकवान ठेवा,एका बाऊल मधे डाळ घाला.
त्यावर चिंचेची चटणी, हिरवी चटणी, चमचाभर कांदा, 1 मोठा चमचा कोथिंबीर आणि चाट मसाला एकसमान पसरा.
इतर डिशमध्ये वाढताना वरील स्टेपची पुनरावृत्ती करा. त्वरीत वाढा.


Ps.. दरवर्षीच आम्ही दिवाळी एकत्रच साजरी करतो, त्यामुळेच दिवाळी म्हणजे धमाल असते. आम्ही सर्वचजण आतुरतेने दिवाळीची वाट पाहत असतो.
दिवाळीत फराळ तर असतोच पण…. रोज जेवणासाठी नविन पदार्थ, त्यातलीच ही एक recipe…
आमच्या भाचे मंडळी ना चटपटीत व नविन पदार्थ आवडतात. त्यामूळे पदार्थ करायलाही उत्साह येतो…
[ ] दाल पकवान चा tempting smell मुळे खाण्याची घाई इतकी झाली की फोटो काढलाच नाही, next time फोटो काढून नककीच upload करेन.
[ ] ही recipe dedicated to माझी ननंद सरोज कनोरे… आज खरतर त्यांच साठीच घाई घाईत recipe लिहिली.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s