Suvarna's Kitchen

ब्रेड पकोडा

Scroll down to content

साहित्य

ब्रेड स्लाइस . . . . . .  ६

बटाटे . . . . . . . . . . . ३-४

बेसनपीठ . . . . . . . . . १ कप

तांदूळ पीठ . . . . . . . . २-३ टे.स्पून

हळद . . . . . . . . . . . . . १/४ टि.स्पून

तेल  . . . . . . . . . . . .    तळणासाठी

लसूण पाकळ्या . . .    .५_६

आलं . . .  . . . . . .  .  .  १”

मोहरी . . . . . . . . . . .    १/२ टिटि.स्पून

कढिपत्ता  . . . . . . . . . . ५_६

हिरव्या मिरच्या . . . . .   ३-४

कोथींबीर . . . . . . . . . . .२ टि.स्पून

तिखट . . . . . . . . . . . . . १/२ टि .स्पून

मीठ . . . . . . . . . . . . . . . चवीनुसार

पुदिना . . . . . . . . . . . .   २ टि.स्पून

लिंबाचा रस . . . . . . . . . १/२ टि .स्पून

कृती

बटाटे उकडून , लगेच स्मॅश करावे म्हणजे गुढळ्या रहात नाहीत .

लसूण , आलं , हिरव्या मिरच्या , कोथींबीर व पुदिना भरडसर वाटावे .

२चमचे तेल तापवून मोहरीची फोडणी द्यावी . मोहरी तडतडली की कढिपत्ता व वाटण घालून जरासे परतून हळद व तिखट घालून परतून, ही फोडणी बटाट्यावर घालावी . मीठ व लींबाचा रस पिळून मिक्स करून ठेवा .

ब्रेड स्लाइसच्या कडा काढून टाकाव्या .आवडीनुसार ब्रेड स्लाइस कापावेत . त्रिकोनी , चौकोनी , गोल .

एका वाडग्यात बेसनपीठ , तांदूळ पीठ , हळद व मीठ घालून पिठ भिजवावे .

तळणासाठी तेल तापवा .

कापलेल्या स्लाइसवर  बटाट्याचे मिश्रण लावावे .

व ही स्लाइस पिठात घोळवून तापलेल्या तेलात तळावे .

दोन्ही बाजू गोल्डन रंगावर तळून गरम पकोडे सर्व्ह करावे .

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: