बाजरीचा खिचडा /बाजरीचा भात

ज्वारी किंवा बाजरी आणि थोडे तांदूळ व डाळ वापरून केला जाणारा हा प्रकार अतिशय पौष्टिक आणि रूचकर लागतो व करायला अतिशय सोपा आहे One dish meal

साहित्य

बाजरी १ वाटी

चणाडाळ १/४ वाटी

तांदूळ १/२ वाटी

हिरव्या मिरच्या

कांदा १ मोठा

टोमेटो १

शेंगदाणे मूठभर

कांदा लसूण मसाला

लाल तिखट

मीठ चवीनुसार

तेल 3-४ चमचे

जिरे

कढीपत्त्याची पानं

हळद

तिखट

हिंग

वाटण साहित्य

लसूण पाकळ्या ५-७

खोबरं 3 टीस्पून

आलं लहान तुकडा , जाडसर वाटून घ्यावं

कृती

बाजरी स्वच्छ धुवून १५-२० मिनिटं भिजत ठेवावी .

पाणी काढून टाकावे व निथळत ठेवावं , सधारण १५-२० मिनिटं

निथळून घेतलं की घरातच स्वच्छ कपड्यांवर जराशी पसरून ठेवावी .

सधारण १५-२० मिनटात कोरडी होते , नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बाजरी जाडसर वाटून घ्यावी .

बाजरीचा कोंडा काढून टाकला तरी चालतो पण कोंडाही पौष्टिक असतो त्यामुळे नाही काढला तरीही चालेल .

डाळ तांदूळ धुवून ठेवा .

एका स्टीलच्या भांड्यात तेल तापवून त्यात जिरे , हिंग , कढीपत्ता फोडणी देवून शेंगदाणे घालावे .

कांदा घालावा जरासा परतून टोमेटो घालावा .

वाटण घाला.

जरासं परतून बाजरी घालावी .

छान परतून हळद , तिखट व कांदा लसूण मसाला घालून परतावं .

धुवून ठेवलेले डाळ तांदूळ घालावे .

प्रमाणात मीठ घालून चांगलं मिक्स करावं .

पाणी कोमट करून घालावं .

पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून मोठ्या कुकरमध्ये हे पातेलं ठेवून कुकरच्या 3-४ शिट्या घ्याव्या . प्रत्येक कुकरचा अंदाज वेगळा असतो. तेव्हा आपल्या अंदाजानुसार ठेवा.

साध्या खिचडीपेक्षा बाजरी शिजायला जास्त वेळ लागतो त्या अंदाजाने ५-७ मिनिटं जास्त वेळ शिजू द्यावं .

प्रेशर सुटल्यावर चमच्यानं नीट हलवून एकत्र करा. कारण बाजरीचा लगदा भांड्याच्या तळाशी बसतो.

त्यावर आता कोथिंबीर व साजूक तूप घालून गरमच serve करावं .

सोबत पापड , दही मस्त लागतं .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s