चटकदार भरली मिरची

साहित्य सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

छोट्या जाड मिरच्या ५-६

बेसनपीठ ३-४ चमचे

हिंग चिमुट

हळद १/४ टिस्पून

मीठ चवीनुसार

तेल २ टेस्पून

जिरे १/४ टिस्पून

मोहरी १/४ टिस्पून

कोथिंबीर बारीक चिरलेली २ चमचे

१/२ टेस्पून धणेपूड

१/२ टिस्पून आमचूर पावडर

१/२ टिस्पून साखर (optional)

कृती

छोट्या जाड्या मिरच्या . लांबट हिरव्या मिरच्या घ्याव्यात या मिरच्या कमी तिखट असतात, आणि त्यांची साल जाडसर असते. पण चवीला खुप छान लागतात.

प्रत्येक मिरचीच्या मध्ये जरासा काप द्यावा.

बिया काढून टाकाव्यात .

फ्राईंग पॅनमध्ये १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात आधी बेसनपीठ घालून एखादं मिनीट परतावे आणि नंतर बाकीचा मसाला घालावा. १-२ मिनीटे परतावे. मसाला बाजूला काढून ठेवावा.

मिरच्या धुवून पुसून घ्याव्यात. त्यांना उभी चिर द्यावी जेणेकरून त्यात मसाला भरता येईल.

सदर मिश्रण मिरच्यांमध्ये दाबून भरावं.

दुसरीकडे एका कढईत १ चमचा तेल गरम करून, त्यात जिरे, मोहरी घालून मग भरलेल्या मिरच्या घालाव्यात.

झाकण घालावे , ५ मिनटांनी मिरच्या हलकेच उलटाव्या.

या मिरच्या लगेचच शिजतात . अगदीच मऊ् आवडत असल्यास कींचीत पानी शिंपडा . व परत २ मिनिटं झाकण ठेवा . शिजल्यावर गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवावं.

या मिरच्या पटकन होतात. जेवताना त्या तोंडी लावायला घेतल्यास जेवणाला चव येते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s