लाल माठाची भाजी

लाल माठाचे महत्व सर्वजण जाणतात पण खाताना मात्र टाळाटाळ करतात. ही भाजी बनवायला अगदी ८-१० मिनटे लागतात. तुम्ही ताट वाढायला घेतली आणि ही भाजी फोडणीला घातलीत तरी ताट वाढून होईपर्यंत मस्त भाजी तयार होते.

साहित्य
१ जुडी लाल माठ
१ मध्यम आकाराचा कांदा
३ चमचे खवलेले खोबरे(optional)
३-४ हिरव्या मिरच्या

८-१० लसूण पाकळ्या

१ छोटा चमचा जिरे

१ लिंबाचा रस (optional)

१ चमचाभर तेल

मीठ चवीप्रमाणे

कृती

लाल माठाची पाने निवडून, धुऊन , निथळून आणि चिरून घ्या कांदा बारीक चिरून घ्या .

मिरचिचे छोटे तुकडे करून घ्या .

लसूण पाकळ्या ठेचून घ्या .

कढईत, एक मोठा चमचा तेल घालून कढई तापवत ठेवा.

तेल तापले की, जीरे घाला .जीरे तडतडले की

मिरची आणि लसूण घाला.  चिरलेला कांदा घाला.

२ ते ३ मिनटे कांदा गुलाबीसर होईपर्यंत परता.

आता ह्यात चिरलेली लाल माठाची पाने घाला.

मध्यम आचेवर भाजी २ मिनटे परता. भाजी बरिचशी आळेल.

चवीनुसार मीठ घाला.

भाजी शिजली की आचेवरून उतरून त्यात लिंबाचा रस आणि खोबरे घाला.

चांगले ढवळून, गरम गरम भाकरी सोबत खायला द्या.

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s