डाळ – तांदूळ खिचडी

लागणारा वेळ
३० मिनिटे
लागणारे जिन्नस

मध्यम वाटी तांदूळ
मध्यम वाटी तूरडाळ डाळ
चवीनुसार मीठ
१/२ टीस्पून हळद
/ २ तमालपत्रं

चमचाभर

जिरं
तिखट आवडत असेल तर काही मिरीदाणे (शक्यतो यात घालत नाहीत, पण खातांना मध्ये मध्ये आलेले मस्त लागतात; नाही घातले तरी चालेलच)
चमचाभर तेल किंवा आवडीप्रमाणे साजुक तूप
पाककृती
डाळ + तांदूळ एकत्र करून स्वच्छ धूवून, १५/२० मिनिटं पाण्यात भिजवावे.
कुकरला नेहेमीप्रमाणे खिचडी शिजवून घ्यावी. शिजतांना, मीठ + हळद घालावं.
कुकरचं प्रेशर गेलं की गरम असतांनाच, त्यात खिचडी पातळसर/ पळीवाढी होईल इतकं पाणी घालावं. पुन्हा गरम करत ठेवावी ही खिचडी.
आता आवडीप्रमाणे जरा सढळ हातानी तेल किंवा तुपाची फोडणी करावी. त्यात भरपूर जिरं अन तमालपत्र घालून खमंग फोडणी खिचडीवर ओतावी. मिरीदाणे घेतले असतील तर ते फोडणीत घालावे.
नीट ढवळून रटरटू लागली की गरमागरमच खावी. हवं असेल तर अजून साजुक तूप वरून घेता येईल.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s