बाजरीची भाकरी

चुलीवरची गरम भाकरी. वांग्याचे भरीत, ठेचा, लोणी, मेथीचा घोळणा असे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडत. परंतु आता आपल्या कडे गॅस शेगडी असल्यामुळे चुलीवर नाही पण गॅस शेगडीवर बनवून भाकरी आपण नक्कीच खाऊ शकतो. तर आज आपण बघूया बाजरीची भाकरी कशी करायची.

साहित्य

बाजरी पीठ १ वाटी

पीठ भिजवण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी

मीठ चवी नुसार (optional )

भाकरी लाटण्यासाठी थोडे बाजरीचे पीठ बाजूला ठेवावे .
बाकीचं पीठ परातीत घेऊन पिठात मीठ टाकून पाण्याने पीठ भिजवून घ्या.

पीठ पाण्यात व्यवस्थित रगडुन पीठाचा गोळा तयार करावा. कुठल्याही भाकरीच्या पीठाला जेवढे रगडले तेवढे ते एकजीव होते आणी भाकरीला तडे जात नाहीत.

सुरवातीला हातावर कोरडे पीठ घेउन या मळलेल्या पीठाचा छोटा गोळा दोन्ही तळहाताच्या खोलगट भागातच फिरवावा, मधे जाड आणि कडेला बारीक असा हा गोळा नंतर परातीत खाली थोडे कोरडे पीठ पसरावून त्यावर टाकावा व हातानेच गोल गोल फिरवत थोडा मोठा करावा, परातीला भाकरी चिटकु देउ नये.

(भाकरी करण्याच्या टिपिकल पद्धतीत, खाली बसुन दोन्ही पायाच्या अंगठ्यात परातीची कडा धरुन पीठ रगडतात म्हणजे जोर चांगला लागतो असे म्हणतात तसेच भाकरी मोठी करायलाही सोपे जाते)

आता एका बाजुने भाकरी हळुच उचलुन दोन्ही तळव्यांवर खालच्या कोरड्या पीठाचा भाग वरती येइल अशा रितीने उचलावी.

तवा गॅसवर व्यवस्थित गरम करून थापलेली भाकरी तव्यावर टाका .

आता भाकरीच्या वरच्या बाजुला पाणी गोल फिरवत लावावे, आणि ते पाणी वाळायच्या आत ती भाकरी उलथावी…(पाणी वाळल्यावर भाकरी उलटवली तर तडे जातात) गॅस जोरातच असावा .

आच थोडी कमी करून भाकरी खरपूस भाजून घ्या. भाकरी तव्यावरून काढून दुसऱ्या बाजूने direct गॅसवर भाजून घ्या, म्हणजे छान पोपडा येतो.

अशी हि तयार झालेली बाजरीची भाकरी लोणी किंवा मिर्ची ठेचा सोबत गरम सर्व्ह करा.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s