मालवणी गरम मसाला

मालवणी गरम मसाला

या दिलेल्या साहित्यात सर्वसाधारण 2 किलो मालवणी मसाला तयार होतो .

हा मसाला शाकाहारी/मांसाहारी जेवणासाठी चालतो.

मसाला वापरायला सुरुवात केल्यावर तुम्हाला वर्षभरासाठी किती लागेल याची कल्पना येईल.

जानेवारीत नव्या मिरच्या येतात. तेव्हा मसाला करायला घ्यावा.

साहित्य

१ किलो सुकी लाल मिरची
१/२ किलो धणे
२० ग्राम लवंगा
५० ग्राम काळी मीरी
१०० ग्राम बडीशेप
२५ ग्राम जिरे
२५ ग्राम शाही जिरे
२० ग्राम काळी वेलची
५० ग्राम दालचीनी
५० ग्राम दगडफुल
५० ग्राम नागकेशर
२५ ग्राम काळी मोहरी
२५ ग्राम हळकुंड
१० ग्राम चक्रीफुल
२५ ग्राम खड्याचा हिंग
२ जायफळ

कृती

मिरच्यांना दोन-तीन तास उन दाखवावे. मग हाताने देठ तोडुन, साफ करुन अजुन दोन दिवस उन्हात वाळवाव्या. चांगल्या कडक व्हायला पाहिजेत. मिरची हाताने तोडल्यास कटकन तुटली पाहिजे.

मिरच्या कडकडीत असल्या की मसाला चांगला बारीक कुटला जातो आणि चाळल्यानंतर मागे उरणारा भुस्साही खुपच कमी निघतो.

प्रथम हळकुंड, जायफळ व हिंग यांचे बारीक तुकडे करा.

धणे,जायफळ व लाल मिरची सोडून बाकीच्या सर्व वस्तू स्वतंत्रपणे थोड्याश्या तेलात परतून घ्या.

मसाल्याला चांगला सुगंध सुटेपर्यंत परतत राहावे.

सर्वात शेवटी लाल मिरची व धणे परतून घ्या.

मसाले व मिरच्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून थंड होऊ दयावे.

हे मिश्रण थंड झाले कि मिक्सरला लावून बारीकपूड करून घ्यावी. किंवा डंकन मध्ये कुटुन आणावे.

पूड थंड झाली कि बरणीमध्ये भरून ठेवावी.

भरताना मध्ये मध्ये हिंगाचे खडे ठेवावेत म्हणजे मसाला खराब होत नाही.

हवाबंद डब्यात ठेवल्यास हा मसाला चांगलं वर्षभर टिकतो .

हा मसाला शाकाहारी पदार्थ जसे आमटी, उसळी, भाज्या इ. त वापरतात .

मांसाहारी पदार्थात चिकन , मटण , मासे रस्सा इ. त वापरतात.

ह्यातच सगळे असल्यामुळे वेगळा मसाला वापरावा लागत नाही.

https://suvarnaskitchen.wordpress.com/2018/01/09/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%b5/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s