कुरकुरीत बोंबील फ्राय

बोंबील म्हटले कि अनेकांचा जीव कि प्राणच… बोंबलाच्या नुसत्या वासानेच तोंडात लाळ गळायला सुरवात होते . बोंबील तळताना नुसता वास जरी नाकावर रेंगाळला तरी मन अगदी भरून पावते.

ओल्या बोंबिलाची चटणी किंवा तळलेले बोंबिल हे चवीला खासच लागतात ! 

त्याची कृती

साहित्य

४ ते ६ ओले बोंबील

कोथिंबीर मुठभर

७ ते ८ लसूण पाकळ्या

 आल्याचा मोठा तुकडा

एक चमचा लेमन जेस्ट

३ -४ हिरव्या मिरच्या

१ चमचा हळद

फिश मसाला किंवा लाल तिखट

कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ

तांदळाचे पीठ

चवीनुसार मीठ

तळण्याकरिता तेल

कृती

सर्वप्रथम बोंबील स्वच्छ धुवून , निथळून त्याला मधून चीर पाडून घ्यावी.

आता सर्व बोंबील एका टिशू पेपरने किंव्हा सुक्या कपड्याने निपटून कोरडे करावे.

नंतर बोंबिलवर पसरट ताट ठेवून त्यावर किमान ३० ते ३५ मिनिटे वजनदार कोणतेही भांडे किंवा पाटा ठेवायचा. असे केल्याने बोंबील मधले सर्व पाणी निघून ते पात्तळ आणि अधिक कोरडे होतील व खाण्यास कुरकुरीतपणा येईल.

आता आपले बोंबील कोरडे झाले आहेत आणि वजनदार भांडे ठेवल्याने त्यातले सर्व पाणी निघून गेले आहे.

नंतर एक बाजूला आले, लसूण, कोथिंबीर आणि मिरची यांची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी.

पेस्ट तयार झाल्यावर बोंबलावर एक चमचा कोकम आगळ (किंवा लिंबाचा रस ) टाकायचे,  हळद टाकायची,  प्रमाण जास्त असेल त्या नुसार  मसाला किंवा लाल तिखट वाढवून घ्यावा.

तयार पेस्ट  टाकायची.  लेमन जेस्ट टाकायचे. लेमन जेस्ट ने एक सुंदर फ्लेव्हर मिळतो. चवीनुसार मीठ टाकायचे. आता सर्व मसाले एकत्रित करून सर्व बोंबीलला व्यवस्थित चोळून घ्यावे.

मसाले व्यवस्थित चोळून झाल्यावर किमान १५ मिनिटे मुरवून ठेवावे. आता एक प्लेट मध्ये तांदळाचे पीठ पसरवून घावे, बोंबील दोन्ही बाजूने तांदळाच्या पिठात चांगला घोळून घ्यावा.

आता एका पॅन मध्ये ४-५ चमचे तेल टाकून चांगले तापवून घ्यावे, आता फडफडत्या तेलात बोंबील फ्राय करण्यासाठी सोडावे, लक्षात असुद्या की बोंबील तळताना गॅस ची फ्लेम मंध्यम असावी.

एका बाजूने तळल्या गेला की उलटून बोंबील दुसऱ्या बाजूने चांगला शेकवून घ्यावा.

अशा प्रकारे बोंबील दोन्ही बाजूने सोनेरी रंगासारखा खरपूस तळून घ्यावा.

बोंबील तळून झाल्यावर तयार आहे झणझणीत आणि खाण्यास अगदी कुरकुरीत असे  स्पेशल बोंबील फ्राय.

कुरकुरीत बोंबील आपण भाकरी सोबत किंवा असेच स्टाटर्स म्हणून एन्जॉय करू शकता.

Also try out ….

https://wp.me/p5yLaS-1GV

https://wp.me/p5yLaS-1H9

https://wp.me/p5yLaS-1E9

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s