Suvarna's Kitchen

तिळगुळाचे लाडू

Scroll down to content

नुकतीच संक्रांत झाली. अर्थातच घरोघरी गूळपोळ्या आणि तिळगुळाच्या लाडवांचा बेत झालाच असेल.

आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं.

काही घरांमध्ये गुळाचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण साखरेच्या पाकात करतात. काहीजण त्यात डाळवं, खोबरं, दाणे घालतात. सामान्यपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात.

मराठवाड्यात आणि विदर्भातही तिळकुटाचे लाडू केले जातात. हा मऊ पण खुसखुशीत लाडू अप्रतिम लागतो. आज मी याच लाडूंची रेसिपी शेअर करणार आहे.

तुम्हीही एकदा या अतिशय सोप्या पध्दतीनं लाडू करून बघा नक्कीच आवडतील .

तयारीसाठी लागणारा वेळ १५ मिनिटे

बनविण्यासाठी लागणारा वेळ ३० मिनिटे

नग ५०-६०

साहित्य

१ किलो पॉलिश न केलेले तीळ

पाऊण किलो केमिकल विरहीत गूळ किसून

१-२ टीस्पून जायफळ किंवा वेलदोडे पूड

कृती

प्रथम तीळ कढईत घालून मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या.

तीळ चांगले तडतडायला लागले , खमंग वास यायला लागला की तीळ भाजले गेले असं समजा.
तीळ थंड करायला ताटात काढून ठेवून द्या.
तीळ कोमट झाले की मिक्सरमध्ये जाडसर कूट करून घ्या.
नंतर हे जाडसर कूट आणि किसलेला गूळ तसंच जायफळ किंवा वेलदोड पूड हातानं एकजीव करा.

गरज वाटल्यास हे मिश्रण परत थोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्या. अगदी लगदा करू नका, थोडंसं जाडसरच ठेवा.

नंतर परत हातानं चांगलं एकत्र करा आणि आपल्याला हवे तसे लहान-मोठ्या आकारात लाडू वळा.

तीळ कोमट असताना कूट केलंत तर तिळाला जास्त तेल सुटतं म्हणून कोमट असतानाच कूट करा.

या लाडवांना वरून अजिबात तेल किंवा तूप लागत नाही कारण तिळामध्ये भरपूर तेल असतं. हे लाडू अप्रतिम लागतात .

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: