कोकणी वडे /कोंबडी वडे / मालवणी वडे

तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे कोकणाची जान आहे.

थंडीच्या दिवसात गरमागरम चिकन किंवा मटणासोबत कोकणी वडे हा खास बेत असतो. कोकणी वडे करण्याची खास पद्धत आहे. त्यामुळे नेहमी ते केले जात नाहीत. पण जेव्हा केले जातात तेव्हा जेवणाचा स्वाद लाजवाब असतो.

कोंबडी रस्सा आणि हे वडे हि कॉम्बो डीश “कोंबडी वडे ” म्हणून प्रसिध्द आहे.

हे वडे संपूर्ण कोकणात बनवले जातात पण हे “मालवणी वडे ” म्हणून पण ओळखले जातात. हे वडे https://suvarnaskitchen.wordpress.com/2015/02/21/chicken-curry/

किंवा काळ्या वाटण्याचा रस्सा यासोबत खाल्ले जातात.

पूर्वतयारी

वड्यासाठी पीठ बनवणे
साहित्य

जाडा तांदूळ १ किलो

चणा डाळ १०० ग्रॅम

उडीद डाळ ५० ग्रॅम

धणे १ टेबलस्पून

जीरे १ टेबलस्पून

बडीशेप १ टेबलस्पून

मेथी दाणे १/२ टीस्पून

कृती

तांदूळ स्वच्छ धुवा.

निथळून सुती कापडावर पसरऊन वाळउन घ्या. डाळी व इतर पदार्थ धुउन घ्यायची गरज नाही.

तांदूळ धुतल्यामुळे वडे मऊ व हलके होतात.

वरील सर्व पदार्थ एकत्र करून गिरणीतून भरड दळून आणावे.

पीठ हवाबंद डब्यात ठेवावे. खरतरं जेंव्हा वडे करायचे असतील तेंव्हाच पीठ दळून आणावे.

साहित्य वडे

वड्याचे पीठ ३ कप

कांदा १ मोठा

हिरवी मिरची २ ते ३

कोथिंबीर मुठभर

आलं १/२ इंच

लसूण ५ ते ६ पाकळ्या

हळद १/२ टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल तळण्यासाठी आवश्यकतेनुसार

कृती

कांदा, मिरची, आल, लसूण, मिरची हे सगळ वाटून घ्या. काही लोकं आल- मिरची वै. वापरत नाहीत पण कांदा जरूर घालावा. कांद्यामुळे चांगली चव येतेच शिवाय पीठ आंबून येण्यास मदत होते.

एका परातीत वड्याचे पीठ, हळद, मीठ आणि गरम पाणी टाकून चपातीच्या कणकेप्रमाणे घट्ट मळून घ्या. (पीठ घट्टच मळायला हवे, आंबवल्यावर ते सैल होते.)

रात्रभर एका डब्यात उबदार जागेत झाकून ठेवा.

सकाळी पीठ फुगून येईल. छान मऊ झालेलं असेल.

पीठ खूपच मऊ होऊन वडे थापता येत नसतील तर थोडे सुके पीठ घालुन मळून घ्या.

कढईत तेल तापत ठेवून प्लास्टिकच्या पेपरवर वडे थापावे. (पुरीला घेतो तशी पिठाची गोळी घ्यावी), किंवा एक भिजलेला सुती कपड्याचा तुकडा पोळपाटावर पसरून लिंबाएवढ्या आकाराचे पीठाचे गोळे करून वडे थापून घ्या.

वडा एकदम पातळ किंवा एकदम जाड नको. वडा थापुन झाल्यावर त्या मधे एक भोक करुन घ्यावे.

तेल गरम करून मध्यम आचेवर वडे व्यवस्थित तळून घ्या.

गरम तेलात वडे बदामी रंगावर येईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळावेत.

वडे छान फुगतात.

गरम गरम कोंबडी वडे मटणाचा रस्सा किंवा चिकन सोबत serve करावा.

One Reply to “कोकणी वडे /कोंबडी वडे / मालवणी वडे”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s