ग्रिन चिकन

लागणारा वेळ ४० मिनिटे

वाढणी/प्रमाण

५-६ जणांसाठी

लागणारे जिन्नस

१ किलो चिकन साफ करुन धुवुन

२ बटाटे फोडी करुन
ग्रिन मसाला वाटण

मिरच्या १०-१२ (तिखटाच्या आवडीवर अवलंबुन) कोथिंबीर २-३ मुठ

पुदीना १ मुठ

आल १”

लसुण ८-१० पाकळ्या

इतर साहित्य
हिंग

हळद
चवीप्रमाणे मिठ
लिंबु १ मध्यम
गरम मसाला १ चमचा
तेल

पाककृती

प्रथम धुतलेल्या चिकनला वरील वाटण, मिठ, हिंग, हळद, एक लिंबाचा रस चोळून घ्यावे व अर्धा तास मुरवत ठेवावे.
मग तेलावर मुरलेलं चिकन टाकुन बटाट्याच्या फोडी टाकाव्यात. मग सगळ एकत्र करुन २ मिनिटं चांगलं परतावं.

वाफेवर चिकन शिजु द्यावे. पाणी टाकायची गरज लागत नाही , पण टाकायचे असल्यास झाकणावर पाणी टाकून तेच पाणी टाकावे .

शिजल्यावर गरम मसाला टाकुन परत एक वाफ आणून गॅस बंद करावा.

गरमागरम सर्व्ह करावे .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s