Suvarna's Kitchen

मांदेली फ्राय

Scroll down to content

हे मासे दिसायला अगदी सुंदर असतात. खादाडीतील गोल्डफिश. ह्यांचे आकारमान एवढेच असते. अजुन मोठे मी कधीच पाहीले नाहित. चविलाही तितकेच सुंदर असतात.

काही जण लसुण किंवा वाटणही नाही लावत. कारण तळलेल्या माश्यांना वास येत नाही (सुरमई, बांगडा सोडून).

लागणारा वेळ

२० मिनिटे

लागणारे जिन्नस:

मांदेली
हिंग
हळद
मसाला
मिठ
लसूण पाकळ्या ४-५ किंवा आल,लसुण वाटण
तेल तळण्यासाठी

पाककृती

प्रथम मांदेलीची खवले काढून घ्यावीत. मांदेलीची खवले तरती असतात. अगदी हातानेही सहज निघतात. मग डोके, शेपुट व बाजुची परे काढून पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायची. सगळेच कापलेले मासे पाण्यातुन धुवायचे.

आता ह्या कापलेल्या मांदेलींना हिंग, हळद, मिठ, मसाला लावा, व वाटणही लावा.

तवा तापवुन त्यावर थोडे तेल सोडून ठेचलेल्या लसुण पाकळ्या खमंग परतवा आता त्यात मांदेली तलण्यासाठी टाका.

तेल कमी वाटल्यास बाजुने परत सोडा. गॅस मिडीयम ठेवा. चार पाच मिनीटांनी मांदेली परतुन परत तिनचार मिनीटांत गॅस बंद करा.

किंवा एका कढई मध्ये १/२ वाटी तेल गरम करून घ्या.

त्यात घोळवून घेतलेली मांदेली डीप फ्राय करून घ्या. हि तळलेली मांदेली टिश्शू पेपरवर काढा म्हणजे जास्तीचे तेल टिश्शू पेपर शोषून घेईल.

मग हि गरमा गरम कुरकुरीत मांदेली खाण्यासाठी सर्व्ह करा

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: