क्लायमेक्स बिर्यानी

साहित्य

बासमती तांदूळ . . . . . १कप

कोबी ( कापलेला ). .    १/२ कप

फ्लॉवर ( कापलेला )     १/२ कप

सिमला मिरची . . .  . . . १

गाजर . . . . . . . . . . . . . १

हिरव्या मिरच्या . . . . . . २

कोथींबीर . . . . . . . . . .  मुठभर

टोमॅटो . . . . . . . . . . . . १

धणेपूड . . . . . . . . . . . . १ चमचा

लसूण आलं पेस्ट . . . . . १ चमचा

बोनलेस चिकन . . . . . .  १५० ग्रॅम

ग्रीन चिली सॉस . . . . . .  १ चमचा

रेड चिली सॉस . . . . . . . . १ चमचा

पातीचा कांदा व पात . . . . १-१ कप

कृती

तांदूळ शिजवून , एका ताटात  मोकळा करून ठेवा . चिकन स्ट्रिप्स कापून ठेवा .

भाज्या पण कापून ठेवा . टोमॅटो , हिरव्या मिरच्या व कोथींबीर वाटून ठेवा . आता कढईत २-३ चमचे तेल तापवून त्यात चिकन तुकडे टाकून परता, मोठ्या आचेवर भराभर परता. रंग बदलला की त्यात आलं लसूण पेस्ट व वाटलेले वाटण टाकून परता. मीठ घालून चांगले एकत्र करून , थोडेसे पाणी शिंपडा व ५-७ मिनिटे झाकून मंद आचेवर शिजू द्या . त्यानंतर त्यात गरम मसाला , तिखट व ग्रीन व रेड चिली सॉस टाकून परता .गॅस बंद करा . जरा मोठ्या कढईत १-२ चमचे तेल तापवून त्यात पातीचा कांदा घालुन परता. फ्लॉवर , गाजर, कोबी व सिमला मिरची एक एक भाजी टाकून परतत रहा . त्यातच चिकन स्ट्रिप्स व तयार भात टाकून परता , कोथींबीर घाला . गरमागरम क्लायमेक्स बिर्यानी पातीने सजवून सर्व्ह करा .

https://suvarnaskitchen.wordpress.com/2015/12/15/easy-chicken-biryani/
https://suvarnaskitchen.wordpress.com/2015/08/13/smokey-biryani/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s