उडदाचे वडे

साहित्य

उडीदडाळ . . . . . . १ १/२ कप

मिरे . . . . . . . . . . . . . . . ४-६ भरड

हिरवी मिरची . . . . . . . . २

कढीपत्ता पाने . . . . . . .   ५-६

वाढणी . . . . . . . . . . . . .  १०-१२ वडे

कृती

उडीदडाळ धुवून ४-५ तास अथवा रात्रभर पाण्यात भिजत घालावी . नंतर डाळीतील पाणी काढून मिक्सरमधे बारीक वाटावे. वाटतांना पाणी शक्यतो घालू नये . मिक्सरच्या भांड्यातून वाटण एका खोलगट वाडग्यात काढावे . त्यात भरड वाटलेले मिरे , हिरव्या मिरचीचे काप, चिरलेलली कढीपत्याची पाने व मीठ घालून फेसावे . काही मिनीटातच मिश्रण हलके झालेले जाणवेल . मिश्रण अगदीच घट्ट वाटत असल्यास पाण्याच्या हाताने फेटावे ,तसेच पातळ वाटल्यास अगदीच जरासे तांदतांदळाचे पीठ अथवा रवा टाकून फेटावे .  तळण्यासाढी तेल

तापवून आच मध्यम असू द्यावी . एका वाटीत पाणी घ्यावे . उडदाचे मिश्रण हाताळताना आधी हात ओला करावा . वड्याला मध्यभागी भोक पाडून तेलात सोडावे . अशा पद्धतीने सर्व वडे तळून घ्यावेत . वडे तळताना आच मध्यमच ठेवावी , आच कमी असल्यास वडे तेलकट होतात तसेच आच जास्त असल्यास वडे आतून कच्चे रहातात . गरम वडे चटणी व सांबार सोबत सर्व्ह करावे .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s