दहीवडे

PicsArt_1429798870250

दहीवडे  

  साहित्य
उडदाची डाळ १ कप

मीठ चवीनुसार
हिरवी मिरची ४

कढीपत्ता १० पाने

दही मिश्रण साहित्य
दही ३ कप

साखर अथवा मध                        २ चमचे अथवा चवीनुसार

जीरेपूड किंवा चाटमसाला           २ चमचे

मीठ

लाल तिखट

खजूर चिंच चटणी                        २ चमचे
कृती
उडदाची डाळ ४_५ तास पाण्यात भिजत  घाला.

PicsArt_1429881163819

 

४ ते ५ तासाने डाळीत हिरव्या मिरच्या , कढीपत्ता व मीठ टाकून वाटून घ्या .

मिश्रणात गरज वाटल्यास किंचित पाणी घाला.

PicsArt_1429880993012

 

 

 

 

तळण्यासाठी कढईत तेल तापवा.

ओल्या हाताने साधारण २ चमचे मिश्रण घेऊन वडे तळा.

PicsArt_1429880334043

 

एका भांड्यात पाणी किंचित तापवा व त्यात १/२ चमचा मीठ घाला.

PicsArt_1429879222925

 

तळलेले वडे गरमच ह्या पाण्यात टाकून १० मिनीटे भिजवा.

 

पाण्यातून हलकेच दाबून अतीरीक्त पाणी काढून टाका.

 

पसरट भांड्यात वडे ठेवा .
दही कृती
घट्ट दह्यात मीठ व साखर टाकून घुसळा.

PicsArt_1429880881157

 

मध टाकणार असल्यास दही व मिठ घुसळून नंतर मध टाकून मिश्रण हलवा.

PicsArt_1429802410899

 

हे मिश्रण वड्यावर ओता व फ्रीजमधे ठेवा .

PicsArt_1429802216314

 

सर्व्ह करतांना सर्व्हींग प्लेट मधे २_३ वडे दह्यासकट ठेवा .

त्यावर मीठ , लाल तिखट व जीरेपूड अथवा चाटमसाला भुरभुरवा.

PicsArt_1429801556906

 

 

आवडत असल्यास खजूर चिंच चटणी टाका .

PicsArt_1429801134574
थंडगार व चवदार  दही वडे उन्हाळा नक्कीच आल्हाददायक बनवतील.

PicsArt_1429799095026

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s