श्रीखंड

shrikhand 1.jpgश्रीखंड (shrikhand)

गुढीपाडवा म्हणजे जेवणाच्या ताटात भात, भाजी, पोळी, कुरडईंसोबत गोडाला श्रीखंड हवेच ! असा अनेक घरातला नियम आहे. सकाळी घरात पूजा झाल्यानंतर कडूलिंबाचा पाला खाल्ला जातो. मग त्या कडवट पण आरोग्यदायी सुरवातीनंतर लो-फॅट दह्यापासून तुम्ही घरच्या घरीदेखील श्रीखंड तयार करू शकता……

गुढीपाडव्याला कसे बनवाल घरच्या घरी श्रीखंड !!

गुढी पाडवा  स्पेशल
साहित्य
दही . . . . . . . . १ किलो
साखर . . . . .  . ३/४ कप
वेलदोडे पूड . . . .२ छोटे चमचे
पिस्त्याचे काप, बदाम आवडीनुसार
कृती
एका पातळ कपड्यात दही बांधून २-३ तास टांगून ठेवावे , म्हणजे दह्यातले पाणी निथळून जाईल.

shrikhand 11 .jpg

हा झाला चक्का.
एका वाडग्यात चक्का, साखर तसेच वेलदोडे पूड  एकत्र करून हॅन्ड ब्लेंडरने अगदी एकजीव होईपर्यंत फिरवावे. चक्का व साखरेतील रवाळपणा पुर्ण जायला हवा .

shrikhand

 
आता बारीक चाळणीने अथवा तलम कपड्यातून गाळून घ्या .

shrikhand  7 .jpg
आपले बेसिक श्रीखंड तयार आहे .

shrikhand3

आता यात बदाम व पिस्त्याचे काप टाकून फ्रीजमधे ठेवा .

केशर टाकायचे असल्यास २-३ चमचे दुधात केशराच्या ३-४ काड्या ५ मिनिटे भिजवून ठेवा व श्रीखंड गाळण्याआधीच मिक्स करावे .  थंडगार श्रीखंड गरमागरम व छान फुगलेल्या  पुरीसोबत सर्व्ह करा.

shrikhand 2
या वर्षी घरीच श्रीखंड करून गुढीला नेवैद्य दाखवूया.

One Reply to “श्रीखंड”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s