आमलेट पोहे
साहित्य
कांदा . . . . . . . . . १ मध्यम
पोहे . . . . . . . . . .१.५ वाटी
हिरवी मिरची . . . . २
हळद . . . . . . . . १ चमचा
काजू . . . . . . . . . . ५_६
कृती
पोहे धुवून चाळणीत निथळत ठेवा .
निथळले कि मीठ व हळद लावून हलकेच मिक्स करुन ठेवा .
एका कठईत तेल तापवून मोहरीची फोडणी द्या .
मोहरी तडतडली की हिरवी मिरची परतून काजू टाकावे .
काजू लालसर झाल्यावर कांदा टाकून परतावे .
कांद्याचा रंग बदलला कि लगेच पोहे टाकून मिक्स करावे .
मंद आचेवर झाकून वाफ आल्यावर परत एकदा हलकेच परता व झाकून ठेवा .
आपले पोहे तयार आहेत .
आमलेट
साहित्य
अंडी . . . . . . . . २
मीठ . . . . . . . . आवश्यकतेनुसार
तेल . . . . . . . . . .आवश्यकतेनुसार
मिरी पावडर . . . . चिमूटभर
लाल तिखट . . . . . १ चमचा
दूध . . . . . . . . . . . २-३ चमचे
कृती
एका बाऊल मधे अंडी फोडून घ्या .
त्यात मीठ , मिरी पावडर व लाल तिखट टाकून फेटा.
आता दूध टाकून चांगले फेटा .
नॉनस्टिक पॅन तापवून त्यात २-३ ड्रॉप्स तेल टाकून अंड्याचे मिश्रण पसरवा, २ मिनीटे झाका .
२ मिनीटांनी उलटून न झाकता एखाद मिनिट ठेवा .
तोपर्यंत एका प्लेटमधे गरमागरम पोहे वाढा व त्यावर गरमागरम आमलेटनी झाका.
वरतून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
सोबत लोणचं लावल्यास लज्जत अजूनच वाढेल .