पुरणपोळी

पुरणपोळी

puranpoli1.jpg

आता होळीची तयारी बहुतेक ठिकाणी झालीच असणार , भारतात प्रत्येक प्रांतात होळी तर पेटवतातच पण पद्धतीत थोडा फार फरक आहेच.
महाराष्ट्रात होळीची तयारी तरूण मुले एखादा  महिना आधीच करायला लागतात , लाकडे जमवा जमवी करायला लागतात .

पोर्णिमेच्या सायंकाळी सोयीच्या ठिकाणी होळी पेटवतात, सर्वप्रथम जमीनीवर लहानसा खड्डा करून मधे एरंड उभा करून व त्याभोवती गोवरया व लाकडे रचली जातात .
व्रतकर्ता स्नान करून ‘ होलिकायै नमः! ‘ हा  मंत्र म्हणून होळी पेटवतात आणि होळीची प्रार्थना करून व प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करतात.
होळी चांगली पेटल्यावर सुवासिनी स्रीया होळीची प्रार्थना करुन पुरणपोळीचा नेवैद्य अर्पण करतात .
तर आपणही होळीचे स्वागत पुरणपोळीचा नेवैद्य दाखवून करूया .

पुरणपोळी
साहित्य
चणाडाळ . .  . . . . २ वाट्या
चिरलेला गुळ . . .   २ वाट्या
गव्हाची कणिक . . .२ वाट्या
तेल . . . . . . . . . . .३ चमचे
मीठ . . . . . . . . .    १/२ लहान चमचा
वेलदोडे पूड . . . . .  १  लहान चमचा
जायफळ पूड . . . . . १/४ चमचा
तूप . . . . . . . . . . . . गरजेनुसार
कृती
चणाडाळ स्वच्छ धुवून कुकरमधे शिजवा, डाळ पाण्यात बुडून वरती थोडे पाणी राहिले पाहिजे . कुकरच्या ४-५ शिट्ट्या होऊ द्या , म्हणजे डाळ छान मउ शिजेल.
कुकर जरा निवल्यावर डाळ चाळणीत काढुन घ्या .( एका भांड्यावर चाळणी ठेऊन त्यात डाळ काढा.) पाणी निथळून डाळ कोरडी होईपर्यंत चाळणीत ठेवा .

20150227_185940.jpgहे पाणी म्हणजेच कट, हे पाणी कटाची आमटी करण्यासाठी वापरायचे आहे , हे पाणी बाजूला ठेऊन द्या .
एका जाड बुडाच्या भांड्यात शिजवून निथळून घेतलेली डाळ व किसलेला गुळ एकत्र करून मंद आचेवर शिजवून घ्या , मिश्रण आधी पातळ होऊन मग घट्ट होईल .

20150227_192259
गरम असतानाच पुरण पात्रात अथवा फुड प्रोसेसर मधे वाटून घ्या , वाटतानाच वेलदोडे व जायफळ पूड मिसळा . हे पुरण बाजूला ठेऊन द्या .

20150227_192402.jpg

एका परातीत बारीक दळलेले गव्हाचे पीठ, मीठ , तेल व पाणी घेऊन पीठ मळून घ्या . हे पीठ हाताला अगदी मऊ व चिकट लागायला हवे . हे पीठ  किमान १/२ तास झाकून ठेवा .
१/२ तासाने पीठ पुन्हा खूप चांगले मळून घ्या .

कणीक चांगले मळले गेले म्हणजे पोळ्या फुटून पुरण बाहेर येत नाही .हाताला थोडे तेल लावून पिठाचा उंडा घ्या , त्याची खोलगट वाटी करून  पुरण  भरून सर्व बाजूने बंद करा .

20150227_195208

पोळपाटावर गव्हाचे किंवा तांदळाचे कोरडे पीठ टाकून त्यावर हलक्या हाताने पुरणपोळी लाटा . व गरम तव्यावर बाजूने छान भाजा, आच कमीच ठेवा.

20150227_195423.jpg

आवडत असल्यास तव्यावरच तूप सर्व बाजूने सोडून भाजा , किंवा कोरडीच पुरणपोळी काठून मग त्यावर तूप टाका.

20150227_200803

दोन्ही प्रकारे छानच लागते .
गरमागरम पुरणपोळीचा आनंद भरपूर तूप व कटाची आमटी सोबत घ्या .

puranpoli1

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s