एग बिर्यानी

एग बिर्यानी

गेल्या एक महिन्यापासून विविध सहज सोप्या पाककृती पोस्ट करताना जेवढा आनंद झाला , त्याही पेक्षा जास्त आनंद झाला जेव्हा काही पाककृती खास फरमाईश पोस्टवर वा फोनवर कळवण्यात आल्या .

अश्या काही पाककृती खास बनवून व मुलांकडून पास करून घ्यायला वेळ लागणारच.

त्यातलीच एक ‘एग बिर्यानी ‘ खात्री आहे कि तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल .

एग बिर्यानी
करायला अतिशय सोपी परंतु अतिशय चविष्ट बिर्यानी ! जेव्हा थोडक्यात काहीतरी छान मेनू करण्याची इच्छा असेल, काहीतरी स्पेशल त्यासाठी बेस्ट !!!
कमी वेळ , कमी साहित्य त्याचप्रमाणे कमी मेहनतीत जेवण तयार !!!!
साहित्य . . .
अंडी . . . . .      ४
तांदूळ . . .        १ मोठी वाटी
तेल . . . . .       ३_४ चमचे
शहाजिरे . .  .    १ छोटा चमचा
वेलदोडे . . .       ४
तेजपान . . .      १
लवंग . . .          ४
दालचिनी . .       १
कांदा . . . .         १ मोठा
हिरवी मिरची      १
लसूण . .  . .       ३_४ पाकळया
आलं . . . . . .      १इंच तुकडा
टोमॅटो . . . . .      १ मध्यम
हळद . . . . . .      १ छोटा चमचा
तिखट . . . .        १ छोटा चमचा
मीठ . . . . . . .     गरजेनुसार
बिर्यानी मसाला   २ छोटे चमचे
दही . . . . . . . .   २_३ चमचे
कोथिंबीर . . . .    १/२ वाटी
पुदिना . . . . . .    १० पाने
कृती
अंडी उकडून धुवून काट्याने अथवा सूरीने बारीक चिरा द्या , नॉनस्टिक पॅनमधे १ चमचा बटर घेऊन अंडी हलकेच परता.

egg biryani

  अंडी  किंचित लालसर झाले  कि त्यात थोडे मीठ व बिर्यानी मसाला घालून जरासे परतून बाजुला ठेवा .

egg biryani 2
पॅनमधे तेल तापवून त्यात शहाजिरे , तेजपान , वेलदोडे व लवंगाची फोडणी द्या .
आता त्यात हिरवी मिरची व लसूण आलं ठेचून
टाका.
उभा चिरलेला कांदा साधारण लालसर होइस्तोवर परतून बारीक चिरलेला टमाटा टाकून ३_४ मिनीटे परता .
आता त्यात हळद , तिखट व मीठ टाकून परता.

दही टाकून मिक्स करा .
आता बासमती तांदूळ टाकून मिक्स करा.

egg biryani 5
सर्व चांगले परतून प्रमाणात पाणी टाकून  मोठ्या आचेवर भात अर्धवट शिजल्यावर त्यात उकडून परतलेली अंडी टाकून हलकेच मिक्स करून मंद आचेवर बिर्यानी पूर्ण शिजू द्या .

egg biryani 1
आच बंद करून बारीक चिरलेले कोथिंबीर व पुदिना टाकून  हलकेच बिर्यानी वरखाली करून  पुन्हा ५ मिनिटे झाकून ठेवा .
साजूक तूपात परतलेले काजू टाकून गार्णीश
गरमागरम एग बिर्यानी कोशिंबीरी सोबत सर्व्ह करा.

egg biryani

5 Replies to “एग बिर्यानी”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s