कोंबडी रस्सा

कोंबडी रस्सा

कोंबडी रस्सा 6 .jpg

जेव्हा ब्लॉग लिहिण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाषा कोणती असावी हा प्रश्न होता .
मराठी , हिंदी , गुजराती कि इंग्लिश ?
शेवटी विचार केला कि इंग्लिश छान , सर्वांनाच वाचता येईल .
पण ‘ मराठीत का लिहित नाहीत ‘ ‘ मराठीत लिहिणार का?’ हे प्रश्न आले . त्यानंतर विचार केला कि मराठीत लिहावे .आणि या आठवडया पासून सर्व पाकक्रीया इंग्लिश व मराठी दोन्ही भाषांमधे असतील .
अपेक्षा आहे कि तुम्हा सर्वांना नक्कीच आवडतील . कारण ज्या ज्या  पाकक्रियेला  ‘ खूपच चवदार, अश्या प्रतिक्रिया मिळाल्या त्याच रेसीपी आहेत .
प्रत्येक पदार्थाचे माप वाटी, चमचा , ज्याची आपल्याला नेहमी वापरायची सवय असते ,  तेच आहेत . प्रत्येक वेळी ग्रॅम, लिटर मधे मोजून घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही .
त्याचप्रमाणे सर्व पाकक्रिया अतिशय सोप्या
पद्धतीने लिहिल्या आहेत .

कोंबडी रस्सा……………….

४ जणांसाठी

साहित्य
कोंबडी  . . . . .   १/२ किलो
बटाटा  . . . . . .  १
लवंग     . . . . . .  ४-५
वेलदोडे   . . . . . .  ४
तेल          . . . .   ३-४ चमचे
कांदे          . . . .   २ मोठे
टमाटा         . . . .  १ मोठा
हळद           . . . .  १ छोटा चमचा
तिखट          . . . . .२ चमचे
गरम मसाला    . . १ छोटा चमचा
धणे पावडर   ……. ३ चमचे
कोथिंबीर     ……….मुठभर
पुदिना    ………….. १०-१२ पाने
लसूण     ……….     ५ पाकळ्या
हिरवी मिरची  . . . . . ३-४

कृती
जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करुन शहाजिरयाची फोडणी द्यावी . लवंग व वेलदोड टाकावे ,

बारीक चिरलेला लसूण व उभी चिरलेली हिरवी मिरची  टाकून दोन मिनीटे परतून  लगेच  बारीक चिरलेले कांदे टाकून परतावे ,

कांदा पारदर्शक झाला कि कापलेले  टमाटे टाकून २ मिनिटे परता .

कोंबडी रस्सा 2.jpg

स्वच्छ धुतलेल्या कोंबडीचे मध्यम आकाराचे तुकडे व साल काढलेला बटाटा कापून टाकावा व ५ मिनीटे छान परतावे .

कोंबडी रस्सा 4

आता त्यात धणे पावडर , हळद, तिखट टाकून , गरम मसाला तसेच पुदिना व कोथिंबीर टाकून परतावे .

कोंबडी रस्सा 5कोंबडी रस्सा

कोंबडी रस्सा

साधारण २ ते २.५  ग्लास पाणी टाकावे , मीठ टाकावे .

एका उकळी नंतर झाकण ठेवावे व आच कमी करून शिजू द्यावे ,साधारण २५ -३० मिनीटे लागतात , व्यवस्थित शिजू द्यावी . झाकण उघडले कि अगदी छान सुवास सुटेल. भात किंवा पोळी बरोबर वाढा

कोंबडी रस्सा 5

chicken curry 5.jpg

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s